कर्नाटकात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे सत्र निरंतर सुरूच आहे. कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,82,354 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या 79,908 इतकी वाढली आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने आणखी 4,267 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 354 इतकी झाली आहे.
राज्यात ॲक्टिव्ह केसेस 79,908 असून यापैकी 681 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज सोमवारी 5,218 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 99,126 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 114 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 3,312 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे.
बेंगलोर शहर (आज 1243 रुग्ण – एकूण रुग्ण 75428), म्हैसूर (374-7685), बेळ्ळारी (253-10624), दावणगेरी (225-3666) आणि कलबुर्गी (196-7537).