मणगुत्ती येथे छ्त्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंधरा दिवसांत उभा करू असा निर्णय पंच मंडळींच्या बैठकीत झाला होता मात्र याबाबत अजूनही कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शिवसेना याबाबत आक्रमक होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कर्नाटकात येऊन कवळीकट्टी ते मनगुत्ती असा पायी दांडी मार्च काढत आंदोलन करणार आहेत.
मनगुत्ती ग्राम पंचायतीने ठराव केलेला असताना काहींच्या विरोधामूळे छ्त्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हटवली होती त्या नंतर या घटनेचे महाराष्ट्र राज्यात पडसाद उमटले होते.सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता.
कोल्हापूर येथील शिवसैनिकांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला होता कर्नाटक सरकारची तिरडी देखील जाळली होती त्याच वेळी कर्नाटक घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्याच दरम्यान मनगुत्ती येथील पंच मंडळींनी बैठक घेत कायदेशीर बाबी पूर्ण करत पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या गावात शिव मूर्ती बाबत कोणताच निर्णय होताना दिसत नाही.
आगामी 24 रोजी पर्यंत मनगुत्ती बाबत ठोस निर्णय न झाल्यास 25 रोजी सकाळी कोल्हापूर शिवसेना कवळीकट्टी ते मनगुत्ती दांडी मार्च काढून आंदोलन करेल असा इशारा विजय देवणे आणि संजय पवार यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.