भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी लागेल असे मत उचगाव मतदार संघाच्या समितीच्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेत वर्धापनदिनी त्या बोलत होत्या. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७३ व वर्धापन दिन नुकताच पार पडला. यावेळी शेकापचे मध्यवर्ती चिटणीस आणि मंडळाचे सदस्य ऍड. भाई राजाभाऊ पाटील हे उपस्थित होते.
प्रारंभी पक्षाचा लाल बावटा ध्वजाचे पूजन तालुका चिटणीस नारायण जाधव यांनी केले. तसेच पक्ष संपर्क प्रमुख भाई एस. एल. चौगुले यांनी श्रीफळ वाढविले. सरस्वती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भाई दाजीबा देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन भाई बाळाराम पाटील यांनी केले. आम. ऍड. व्ही. एस. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन भाई पुंडलिक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल. आय. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला एन. बी. खांडेकर, नानू गोविंद पाटील, आर. आय. पाटील, कल्लाप्पा घाटेंगस्ती, ऍड. आनंद पाटील, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बी. डी. मोहंगेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल. आय. पाटील यांनी केले.