बेळगाव मनपा अखत्यारीत येणाऱ्या नाल्यातील झाड झुडपे व्यवस्थित काढली नसल्याने नाले सफाई योग्य रित्या न झाल्याने बुधवारी शास्त्री असोत किंवा एस पी एस रोड असो या भागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे मागील वर्षीच्या पुराची आठवण पुन्हा केदा बेळगावकरांना झाली आहे.
बेळगाव मनपाने नाल्यामध्ये अनेक न उपयोगी झाडे आहेत. ती काढण्याकडे ते का दुर्लक्ष केलं आहे उन्हाळ्यात नाले सफाई योग्य रित्या झाली नाही त्यामुळे पुन्हा एकदा नाले काठा वरील उपनगरे धोक्यात आली आहे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे घरांचे नुकसान झाले आहे.
शास्त्री नगर भागात एस पी एम रोड भागात अनेक घरात पाणी गेल्याने मागील वर्षी झालेल्या पुराची आठवण ताजी झाली आहे मनपाने केली नाले सफाई योग्य नव्हती असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना नाले सफाई करण्याचा सूचना दिल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांनी योग्य रित्या नाले सफाई न केल्याने कोनवाळ गल्ली भागातील अनेक घरात देखील पाणीच पाणी झालं होत. अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे नाले सफाई करून घ्या अशी मागणी देखील या भागातील लोकांकडून होत आहे