बेळगाव भाजपचे जेष्ठ नेते शंकर गौडा पाटील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी एक मोठं पद मिळालं असून राज्य मंत्री दर्जावर त्यांचा सरकार मधला दर्जा कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे.
पाटील यांना राज्य सरकार मध्ये बंपर लॉटरी लागली असून कॅबिनेट दर्जाचं पद मिळाल्याचा आदेश आला आहे त्यांना राज्य सरकारचा दिल्ली मधील विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या अगोदर ते मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचे राजकिय सचिव होते त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा होता.
पाटील यांनी बेळगाव मधील भाजपसाठी सुरुवाती पासून योगदान दिले ते जुन्या नेत्यांपैकी एक आहेत या अगोदर त्यांनी बुडा अध्यक्ष,कर्नाटक वन विकास औद्योगिक निगम महामंडळ अध्यक्ष, आता मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव अशी मोठी पदे मिळवली होती ते मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा यांचे जवळीक मानले जातात.
मागील महिन्यात राज्य सभा निवडीत देखील त्यांचं नाव घेतलं जातं होत मात्र शेवटच्या क्षणी इरानाना कडाडी यांना ते पद मिळालं आता पाटील हे राज्य सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी देखील बनले आहेत मुख्यमंत्र्यांच्या राजकिय सचिव पदा सोबत ही देखील लॉटरी त्यांना लागली आहे.
राज्य व्यतिरिक्त दिल्लीतील कर्नाटक सरकारच्या प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेवणार आहेत.