कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्या वाढतंच चालली आहे.बेळगाव शहरातील शहापुरची बाजारपेठ, सराफी बाजार, कपड्याची दुकानं आणि भाजी मार्केट एकत्रच असल्याने गर्दीचे प्रमाण बरेच वाढले आहे.
बेळगाव शहर आणि उपनगरात कोरोना बाधित पोजिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक झाले आहे या पाश्वभूमीवर शहापूर येथील सराफी असोसिएशनने तातडीची बैठक घेऊन सभासदांची मते जाणून घेतली.सराफ असोसिएशनच्या इमारतीत दिलीप तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
सभासदांनी मते मांडताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दुकाने काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते चर्चेने पुढे आला.ग्राहकांच्या सोयीसाठी व मागील ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सोमवार दिनांक 24 आगष्ट 2020 पर्यन्त दुकाने 2 वाजे पर्यंत सुरु रहातील व त्या नंतर 25 आगष्ट 2020 ते10 सप्टेंबर 2020 शहापूर भागांतील सर्व सराफी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहापूर सराफी कट्ट्या दुकानां सोबत उपनगरे व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सराफी व्यावसायिकांनी, व सराफी व्यवसायाशी संबंधित टंच,आटणी तार पाष्टा आदी व्यावसायिकानी व्यवसाय बंद ठेऊन सर्व व्यापाऱ्यांचे हित जपावे असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी कोरोना बाबत उपचार चर्चा करण्यात आली यावेळी अनेक सभासदांनी विदारक अनुभव सांगून परिस्थितीचे गांभीर्य विषद केले.सर्व सभासदांनी एकमतांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील राहण्याचे ठरवले.बैठकीत उपाध्यक्ष अभिनंदन लेंगडे, उदय कारेकर आदी उपस्थित होते.