Friday, November 15, 2024

/

जाता जाता…आश्लेषाने झोडपले

 belgaum

स्वातंत्र्यदिनी बेळगाव शहर आणि परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.आश्लेषा नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाने शहराला झोडपले व मघा नक्षत्राकडे वाटचाल केली.

रविवारी संध्याकाळी सात वाजता मघा नक्षत्र सुरु होणार आहे, त्याच्या एक दिवस अगोदर आश्लेषा नक्षत्राने बेळगाव परिसराला झोडपत सांगतेकडे वाटचाल केली आहे.

आश्लेषा नक्षत्राचे वाहन मेंढा आहे जर वाहन मेंढा असेल तर पाऊस हुलकावणी देतो असे म्हटले जाते मात्र यावर्षी या नक्षत्राने बेळगाव परीसराला पावसाची जबरदस्त टक्कर दिली आहे.आश्लेषा नक्षत्र आणि मेंढा वाहन असेल आणि इतका पाऊस तर मघा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने अतिवृष्टी होऊ शकते असे पंचागात वर्तवण्यात आले आहे.

Rain belgaum
Rain belgaum

जुन्या काळात ‘मघा आणि चुलीजवळ …’ अशी म्हण होती याचा अर्थ असा होतो की मघा नक्षत्र काळात असा तुफान पाऊस होतो की चूल सोडून बाहेर जाता येत नाही माणसं थंडी पासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ बसून रहातात.

शनिवारी सकाळी पासून रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते वातावरण ढगाळ आणि कुंद असल्याने सर्दी खोकला ताप अश्या किरकोळ व्याधी लोकांना होत आहेत.मागील लोकांचा अनुभव पहाता लोकांनी मघा नक्षत्रात आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.जन जीवन अस्तव्यस्त झाल्याने बेळगाव शहरातील बहुसंख्य लोकांनी घरीच रहाणे पसंत केले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.