कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश उत्सव सरकारी नियमावली अनुसार साजरा होत आहे त्या शासकीय नियमावलीत गणेश मूर्तीची उंची कमी करून चार फूट करण्यात आली त्याचा फटका अनेक मुर्तीकाराना बसला आहे.कारण शासकीय नियमावली यायच्या अगोदर गणेश मूर्ती तयार झाल्या होत्या त्यामुळे अनेक मूर्तिकाराना आर्थिक झळ सोसावी लागली आहे.
सार्वजनिक गणेश मंडळ संयुक्त महाराष्ट्र चौक गणेश मंडळाने मूर्तिकाराला मदत व्हावी म्हणून केवळ दोन फुटाच्या मूर्तीला अकरा हजार रुपये देणगी दिली आहे. या मंडळाने अगोदर मूर्ती काही ठरवली नव्हती किंवा बनवायला दिली नव्हती मात्र ज्यावेळी शासकीय नियमावली जाहीर झाली त्यावेळी मुर्तीकाराला मदत म्हणून दोन फुटांच्या मूर्तीला एवढी मोठी रक्कम देऊ केली.
पिरनवाडी येथील मूर्तिकार रवी लोहार यांच्या कडून दोन फूट उंचीची मूर्ती घेतली व उत्सव साधे पणाने करण्यासाठी आगेकूच करत आहेत.या मंडळाचे 70 वे वर्ष असून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
केवळ मूर्तिकार नव्हे तर पेंडाल धारकाला देखील या मंडळाने सढळ हस्ते मदत करत सांगेल त्या किंमतीत पेंडालचे काम करून घेतले आहे.
आम्ही पाच दिवस किंवा दीड दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव आयोजन करण्याच्या बाजूने नव्हतो पूर्ण अकरा दिवस शासकीय नियमावली पाळून उत्सव साजरा करणार.मंडपात भटजी पूजेचा मान असलेला पदाधिकारी व्यतिरिक्त कुणीही असणार नाही आम्ही प्रसाद देखील वितरण करणार नाही साध्या पद्धतीने विधायक उत्सव कसा करता येईल याकडे भर देणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाबू हनमशेठ व सचिव रोहन कलघटगी यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.