बेळगाव सरकारी वैद्यकीय कॉलेज अर्थात बिम्स चे वैद्यकीय संचालक डॉ विनय दास्तीकोप्प आणि डॉ सतीश पाटील या दोघांची नेमणूक बनावट आणि बेकायदेशीर आहे असा आरोप माहिती हक्क कार्यकर्ते भिमाप्पा गडाद यांनी केला आहे.
या दोघांवर कारवाई करून त्यांच्या नियुक्त्या रद्द करा व त्यांचे वेतन सरकारजमा करून फोजदारी खटले दाखल करा असा सरकारी आदेश येऊन एक वर्ष झाले पण अजून कारवाई का झाली नाही? असा प्रश्न त्यांनी कर्नाटक सरकार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विचारला आहे.
डॉ विनय दास्तीकोप्प यांची नेमणूक बेकायदेशीर आहे. याबद्दल आपण स्वतः माहिती अधिकारा अंतर्गत माहिती काढून सरकारला दिली.
तसेच 2010 पासून पाठपुरावा करत आहे. ही नेमणूक आणि त्यांना मिळालेली पदोन्नती रद्द करून कारवाई करण्याची गरज आहे. पण कारवाई न होण्यात डॉ दास्तीकोप्प हे कारणीभूत ठरत आहेत. याची योग्य चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
डॉ सतीश पाटील यांनी बिम्स मध्ये दाखल होताना अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र दिले होते. हे आपण स्वतः उघड करून दाखवले आहे. पण वैद्यकीय शिक्षण खाते कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1182033102154281&id=375504746140458