कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात सर्वांवर उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने इतर ठिकाणी कोविड रुग्णांची व्यवस्था केली आहे.
मंडोळी रोडवरील गजानन महाराज मंदिराशेजारील दाट लोकवस्तीतील गेल्या कांही दिवसांपासून बंद असलेल्या मून हॉस्पिटलचे कोविड उपचार केंद्रात रूपांतर करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या परिसराला 15 दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यानी भेट देऊन पाहणी केली होती. आणि कोविड रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता. याची चाहूल लागताच येथील नागरिकांनी याला विरोध केला.
यानंतर येथील नगरसेवक पंढरी परब व इतर नागरिकांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विरोध केला होता. त्यावेळी हा प्रस्ताव रद्द झाला होता, पण सोमवारी एका खासगी डॉक्टरांनी येथे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे