कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी हे राष्ट्रीय नद्या जोडणी धोरण केंद्र सरकारने लवकर घोषित करावे यासाठी प्रयत्नशील आहेत
ते सद्या दिल्ली येथे गेले असून हे धोरण लवकरात लवकर जारी होण्यासाठी त्यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली.
राष्ट्रातील नद्या जोडण्याची मोहीम किती महत्वाची आहे याबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. दरम्यान लवकरात लवकर त्याची घोषणा होईल असे सांगून कर्नाटकात भाजप च्या उपक्रमात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी नड्डा यांना दिली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांशी योग्य समन्वय साधण्यात ते यशस्वी ठरले आहेत. यातच आता थेट दिल्ली येथील नेत्यांच्या संपर्कात येऊन नद्या जोडण्याच्या प्रकल्पासाठी ते आता पाठपुरावा करत आहेत.