मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बुधवारी दिवसभर पावसाने झोडपले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदी-नाले यांना पूर आला होता तर नदीकाठच्या परिसरातील भात पीक पाण्याखाली गेली आहेत.
मात्र बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी रात्रीपर्यंत पावसाने अधूनमधून बरण्यास सुरुवात केली होती. ती मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा झोडपण्यास सुरूवात केली आहे. गुरुवारी रात्रीपासून दमदार सरी पडत असून पुन्हा पाणी पातळीत वाढ झाली आहे.
त्यामुळे महापुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मलप्रभा वेदगंगा दूधगंगा कृष्णा आधी नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर हिडकल जलाशय 66 टक्के भरला आहे. दरम्यान जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. या पावसामुळे भात पिकांना तसेच इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक जन घराबाहेर पडण्यास धजत नाहीत. परिणामी कोरोणाच्या महामारी मुळे अनेक जण धास्तावले असून याच पावसाचाही जोर वाढला आहे. त्यामुळे मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आले असून परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर असाच पाऊस राहिल्यास तर पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सध्या तरी पावसाने विश्रांती घ्यावी अशीच मागणी शेतकरी करू लागले आहेत.