राज्यात अनलॉक ४ प्रक्रिया सुरु झाली असून अनेक उद्योग, व्यवसायांना पुन्हा सुरुवात करण्याची परवानगी मिळत आहे. राज्याला सर्वात जास्त महसूल मिळणाऱ्या बार आणि पाबलाही १ सप्टेंबर पासून सुरुवात करण्यासाठी हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. याबद्दलची मार्गसूची आणि निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुन्हा बार आणि पब १ सप्टेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. परंतु यामध्ये कोविड संदर्भातील नियम आणि अटींचा समावेश असून मार्गसूचीनुसारच बार सुरु करण्यात येतील.
यासंदर्भात अधिकृत दुजोरा अबकारी खात्याकडून येणे बाकी असून याबाबत आवश्यक मार्गसूची तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे अशी माहिती बंगळूर येथे अबकारी आयुक्त एम. लोकेश यांनी दिली आहे. यामधील महत्वाची अट म्हणजे बारमध्ये कमीतकमी ५० व्यक्तींना अनुमती देण्यात येणार आहे. शिवाय एका टेबलवर २ व्यक्तींशिवाय अधिक व्यक्तींना बसण्याची परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.