महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका वारंवार नागरिकांना बसत आहे. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून हात वर करण्यात धन्यता मानणार्या महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होऊ लागले आहे. रघुनाथ पेठ अनगोळ येथील पथदीप मागील पंधरा दिवसांपासून बंद आहेत.
मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. रघुनाथ पेठ अनगोळ ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंत येथील पतदीप बंद आहेत. रघुनाथ पेठ हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे.
उद्यमबाग, शिवशक्ती नगर नाथ पै सर्कल आदी भागात ये-जा करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असून येथील पथदीप बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावरून बाजारपेठेत टिळकवाडी हरी मंदिर येथे जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या रस्त्यावरील पद्धतीत बंद पडल्याने नागरिक संतापले आहेत.
यासंबंधी वारंवार तक्रारी करण्यात आली आहे. मात्र महानगरपालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रहदारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.