नळाला पाणी आले नाही, बायको किंवा शेजारी भांडला, पथदीप सुरू आहेत किंवा सुरू झाले नाहीत, गल्लीच्या कोपऱ्यावर मवाली पोरं त्रास करताहेत, रस्त्यावर कोंडी पासून इतर कुठल्याही कारणासाठी सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो घटक म्हणजे पोलीस.
आपल्या मदतीसाठी सगळ्यात पहिला धाऊन येण्याचा प्रयत्न करणारा हा समाज घटक नेहमीच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी संकटात असतो. मागील पाच महिन्यापासून कोरोनाच्या संकटात फ्रंट वारीयर म्हणून पोलीस काम करत आहेत. जे लोक काम करत नाहीत त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला आदर्श निर्माण करणारा पोलीस वर्ग गणपती च्या तोंडावर ही संकटातच आहे. या घटकाने यावर्षी एक दिवसाचा गणपती उत्सव साजरा करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पोलीस स्थानकातील उत्सव म्हणजे दरवर्षी उत्साह. खून, चोरी, मारामाऱ्या आणि इतर गुन्ह्यात नेहमी हातात काठी आणि आवाजात जरब असणारे पोलीस या उत्सवात मात्र हातात चमचा घेऊन प्रसाद वाटतात. गणेशाचे आगमन, स्वागत, पूजा अर्चा, गणहोम या मुळे पोलीस स्थानकातील वातावरण भारलेले असते. हे वातावरण यावर्षी नाही.
सार्वजनिक मंडळांना नियम लावणाऱ्या पोलिसांनी आपला उत्सव फक्त एक दिवसावर आणून ठेवला आहे. हा एक आदर्शच म्हणावा लागेल.
सर्वच पोलिस स्थानकांमध्ये पोलिसांनी पोलीस स्थानकातून गणपतीचे स्वागत केले आणि कालच साायंकाळी विसर्जन केेलं. त्यानंतर आजपासूूून पोलिसांना पुन्हा रस्त्यावर थांबून राहावे लागेल. लोकांना दिशा दाखवत कोरोनाचे संकट जास्त वाढू नये म्हणून ते सर्वात पुढे उभे राहतील.
2020 च्या मार्च महिन्यात पोलिसांच्या या जादा ड्युटीला सुरवात झाली. कोण ड्युटीला लवकर यायचे या गडबडीत मेले तर बरेचजण कोरोनाच्या संकटात अडकून गेले. आजही अनेक पोलीस अधिकारी कोरोनाच्या संकटात सापडून बाहेर पडून पुन्हा ड्युटीवर आले आहेत. तर अनेक पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत. यावर्षी गणपती बाप्पाने त्यांना शक्ती द्यावी आणि या जगव्यापी संकटात लढा देण्यासाठी बळ द्यावे हीच इच्छा.