इमारतीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील प्लंबिंगचे काम करणाऱ्या एका युवकाचा आज रविवारी सायंकाळी दुर्देवी मृत्यू झाला
आकाश नागो वरपे (वय 24, रा. मूळ मुचंडी, सध्या रा. सोनोली ता. बेळगाव) असे अपघाती मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनोली येथे वास्तव्यास असणारा आकाश प्लंबिंग कामासाठी हलकर्णीला जात होता. काल रविवारी इमारतीवर चढून प्लंबिंगचे काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो इमारतीवरून खाली कोसळला.
या अपघातात आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ बेळगावच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर त्यादिवशी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मात्र त्याचा काहीही फायदा न होता आज सोमवारी सकाळी नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची चंदगड पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
आकाश वरपे यांचे आई-वडील लहानपणीच वारले असल्याने तो सोनोली येथील नातलगांच्या घरी राहत होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उचगांवमध्ये झाले झाले होते. मात्र लाॅक डॉऊनमुळे कारखाना बंद असल्याने सध्या तो प्लंबिंगचे काम करत होता. याप्रकरणी चंदगड पोलिस अधिक तपास करीत आहेत