पिरनवाडी गावात मध्यरात्री संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसवल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.सकाळी पुतळा बसवलेली माहिती मराठी भाषिकांना कळल्यावर शेकडो युवक रस्त्यावर उतरले.
त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन ठिय्या आंदोलन केले.संगोळी रायण्णा यांचा पुतळा अन्यत्र बसवावा शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसवू नये अशी भूमिका मराठी भाषिकांनी घेतली आहे.
आता गावात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून त्यांची ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
दरम्यान सकाळी पोलीस आयुक्त त्यागराज,डी सी पी सीमा लाटकर यांनी पिरनवाडीला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा सुरू केली आहे.पिरनवाडी येथील दहा जण पंचाना जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
असा झाला गोंधळ
दरम्यान पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर चर्चा सुरू असताना लाल पिवळा ध्वज हाती घेतलेला दुचाकीस्वार युवक आला त्यावरून गोंधळ झाला होता.
लाल पिवळा घेतलेल्या युवकांनी ध्वज आडवा केल्याने एकाला काठी लागली त्यावरून गोंधळ माजला पोलिसांना परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी सौम्य लाठीचा प्रहार करावा लागला. एकूणच पिरनवाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवल्या नंतर पिरनवाडी ग्रामस्थांच्या काय आहेत प्रतिक्रिया-पिरनवाडी येथील महिला युवकांना नेमकं काय वाटतंय?-पहा खालील व्हीडिओ
https://m.facebook.com/story.php?story_fbid=320023439219264&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=302892221016515&id=375504746140458