पिरनवाडी गावच्या वेशीवर स्वातंत्र्यवीर संगोळळी रायन्ना यांचा पुतळा वाद प्रकरणाचा मुद्दा आता राज्य स्तरीय बनला असून माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी या प्रकरणी ट्विट केले आहे.
बेळगाव पोलिसांनी रायन्ना पुतळा वाद सौहार्दपणे सोडवावा अश्या आशयाचे ट्विट सिद्धरामय्या यांनी केलं आहे त्यामुळं पिरनवाडी प्रकरण देखील राज्य स्तरीय बनले आहे.गेल्या आठवड्यात मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्या वरून वाद निर्माण झाला होता आता संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्या वरून वाद निर्माण झाला आहे.
पिरनवाडी गावच्या वेशीवर 15 आगष्ट रोजी पहाटे स्वातंत्र्यवीर संगोळळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला होता. रायन्ना यांच्या समर्थकांनी रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर रित्या पुतळा बसवण्याच्या प्रयत्न केला होता त्यावेळी काहींना लाठीचा प्रसाद देखील मिळाला होता.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर काही संघटना आंदोलन करत पुतळा उभा करा अशी मागणी देखील करणार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रायन्ना यांच्या पुतळ्या बाबत बेळगाव पोलिसांशी देखील चर्चा केली आहे.
ಬೆಳಗಾವಿಯ ಪೀರನವಾಡಿಯಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಪ್ರತಿಮೆ ಸ್ಥಾಪನೆಯ ವಿವಾದವನ್ನು ಸೌಹಾರ್ದಯುತವಾಗಿ ಬಗೆಹರಿಸುವಂತೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದೇನೆ. ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಅನುಮತಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ರಾಯಣ್ಣನ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕು. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಸಂಯಮದಿಂದ ನಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು.
— Siddaramaiah (@siddaramaiah) August 16, 2020