पिरनवाडी येथे क्रांतिवीर संगोळळी रायन्ना पुतळ्या प्रकरणी 29 रोजी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात धनगर समाजाच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पिरनवाडी येथे संगोळळी रायन्ना यांचा पुतळा झाला पाहिजे याबाबत सर्वप्रथम राज्य सरकारकडे मीच पत्र व्यवहार केला होता 2018 मध्ये याबाबत सर्वप्रथम मीच पहिले पत्र त्यावेळी रस्ता रुंदीकरण करताना समस्या झाली होती त्यामुळे पुतळा उभा करता आला नव्हता असे ते म्हणाले.
29 रोजी के एस ईश्वराप्पा बेळगावला येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत या सह सिद्धरामय्या सतीश जारकीहोळी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याच स्पष्ट केलं.सगळ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असून सहकार्य करा असेही त्यांनी नमूद केलं.
राज्यातील विविध भागातून आलेल्या संगोळळी रायन्ना समर्थकानी सुवर्ण सौध समोर निदर्शन केली त्या नंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.मोर्चात सहभागी झालेल्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सुवर्ण सौध हजारोच्या संख्येने रायन्ना समर्थक एकत्रित झाल्याने वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती.पिरनवाडी ऐवजी सुवर्ण सौध समोर पुतळा बसवा अशी मागणी काहींनी केल्याने पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे.