इस्पितळाच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेत एका वृद्ध रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना बेळगावातील एका मोठया खाजगी इस्पितळात घडली आहे.
आत्महत्या करणारा वृद्ध हा राजवाडा कंपाऊंड वडगांव बेळगाव या भागातील आहे.तो कोरोनाचा संशयित होता.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार फुफूसाच्या आजाराने त्रस्त झाल्याने त्या वृद्ध रूग्णास गेल्या दोन दिवसांपूर्वी ए पी एम सी पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील मोठ्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर स्पेशल डॉक्टर द्वारा उपचार देखील चालू होते.
शुक्रवारी सकाळी चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी टाकून त्यांनी आत्महत्या केली आहे.
घटनास्थळी ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी भेट देऊन पहाणी केली व पंचनामा केला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नसले तरी नैराश्याने आत्महत्या झाली असावी अशी शक्यता आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत त्या नंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.