Wednesday, November 27, 2024

/

आत्तापर्यंत 53,648 जणांना डिस्चार्ज : बाधितांची संख्या झाली 1.29 लाख

 belgaum

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 5,172 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,29,287 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे उपचारांती कोरोना मुक्त झाल्यामुळे आत्तापर्यंत राज्यातील 53,648 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 5,172 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 287 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 73,219 असून यापैकी 602 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शनिवारी 3,860 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 53,648 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 98 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2,412 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

बेळगाव जिल्ह्यात आणखी 219 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,449 झाली आहे. उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे आज शनिवारी 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 969 झाली आहे. जिल्ह्यात 2,406 ॲक्टिव्ह केसेस असून 9 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी चार जणांचा बळी गेल्यामुळे मृतांची एकूण संख्या 74 इतकी झाली आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1852 रुग्ण – एकूण रुग्ण 57396), म्हैसूर (365-4582), बेळ्ळारी (269-6672), कलबुर्गी (219-5529) आणि बेळगाव (219-3449).

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेंगलोर शहर 338 रुग्ण, धारवाड 39, कलबुर्गी 21, कोप्पळ 19, मंड्या 19, रायचूर 17, बळ्ळारी 15, गदग 14, हासन 13, म्हैसूर 12, तुमकुर 12, बिदर 11, दावणगिरी 10, बेळगाव 9, चित्रदुर्ग 7, मंगळूर 7, हावेरी 7, शिमोगा 7, चामराजनगर 5, चिक्कबेळ्ळापूर 5, उडपी 5, बागलकोट 4, चिक्कमंगळूर 2, कोडगु 2, कारवार 1 आणि विजयपुरा 1 रुग्ण.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.