वाढत्या बर्रीकेडस वडगावात अनेक ठिकाणी टाळे बंद सदृश्य स्थिती दिसत आहे एकीकडे नाथ पै सर्कल ते येळ्ळूर क्रॉस रस्त्याचे काम सुरु आहे त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असताना सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बाजार गल्ली सह पाटील गल्ली भागात अनेक कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी बॅरीकेडस लावण्यात आले आहेत.
शहापूर, वडगावचे शेतकरी बसवेश्वर सर्कल खासबाग,बाजारगल्लीमार्गे वडगाव हरिमंदीर पासून डावीकडे वळून यरमाळ रोड,उजवीकडे वळून येळ्ळूर रोडमार्गे शेताला जात असतात पण बॅरी केडस लावल्याने शेतकऱ्याना त्रास होत आहे. शेताला गेल्यावर परत येतानां मात्र तो मार्ग खुला असेल याची मात्र शाश्वती नसते.त्यात नाथ पै सर्कलपासूनचा नवीन रस्ता व तेथील वरचेवर होणारे लॉकडाऊन पाहून जनता त्रस्त झाली आहे. काही झाले तरी शेतकऱ्यांना रोज शेताकडे कामासाठी जावेच लागते.सध्या शेतात कामे जोमाने सुरू आहेत.भांगलण,भातलावणी सुरु असल्याने महिलांही रिक्षातून जातात.
वडगाव मुख्य बाजारगल्लीतील गर्दीमुळे तर त्या रस्त्यावरून जायचे म्हणजे शिक्षाच वाटते आहे अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहे .
सोमवारी तर बाजार गल्लीतील शेतकऱ्यांची शेताकडे जायची वाटच बंद झाल्याने कूठून वळसा घालून जायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. तिथेही लॉकडाऊन झाले तर अन्य रस्त्यावरून जाता येते का हे फेऱ्या मारून पाहावे लागते.
शेताकडून येतानां शेतकऱ्यांच्या सायकलीवर,दुचाकीवर हिरव्या चाऱ्याचा भारा असतो आणी तशा लॉकडाऊनमधे गाडी ,सायकल वळवून घेणे मोठे जिकिरीचे काम असते.जर तोल एकाबाजूला झाल्यास गाडी,सायकल नक्कीच कलंडते.त्यामूळे वडगाव बाजारगल्लीतील लॉकडाऊनमूळे शेतकरी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोर जाव लागतय.कारण करोना सुरु असला तरी शेतकऱ्यांची काम कांही थांबली नव्हती,नाहित असे मत शेतकरी नेते राजू मर्वे यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना व्यक्त केले