महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी दुपारपर्यंत केवळ ७१ टीएमसी इतके पाणी धरणात असल्याची नोंद झाली आहे.
यामुळे संभाव्य पुराचा धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे धरण पूर्णपणे भरण्यासाठी अजून ३४ टीएमसी इतक्या पाणी भरती होण्याची आवश्यकता आहे. आणि हे धरण क्षमतेने भरल्यानंतर यातील पाणी कृष्ण नदीला सोडण्यात येते.
आता कृष्णा नदीच्या उपनद्यांमधील वेदगंगा, पेरणा, दूधगंगा उर्वरित उपनद्यांमधून सुमारे १ लाख ५० हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीमध्ये वाहते. याशिवाय आज अलमट्टी जलाशयातील केवळ २ लाख २० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले आहे. आजच्या अपडेटनुसार कृष्णा नदीमध्ये “इनफ्लो” पेक्षा “आऊटफ्लो” जास्त झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतीरावर पूर येण्याची शक्यता कमी आहे.
कोयना धरण पूर्णपणे भरण्यासाठी या जलाशयातून सुमारे १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होणे गरजेचे आहे. कोयना जलाशय आणि कृष्णा नदीच्या उपनद्यांमधून कृष्णा नदीमध्ये प्रतिदिन २ लाख क्युसेकहून अधिक पाणी भरती झाल्यास या नदीतीरावर महापूर येण्याची शक्यता असते.
परंतु आजची परिस्थिती पाहता कृष्णा नदीतीरावरील नागरिकांनी आता घाबरण्याचे कारण नाही. धरणातील आजची पाण्याची पातळी पाहता येथील स्थानिकांना संभाव्य पूर्वपरिस्थितीपासून नक्कीच दिलासा मिळाला आहे.