कर्नाटक सरकारने आंतरराज्य प्रवासा संदर्भात सोमवारी नवी नियमावली जाहीर केली आहे.त्यामुळे आता कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी ई पास ची आवश्यकता भासणार नाही.यापूर्वी कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी सेवा सिंधू अँप वर नोंदणी करावी लागत होती.
सीमेवरील नाक्यावर आरोग्य तपासणी करून घ्यावी लागत होती.नंतर चौदा दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागत होते.हातावर शिक्का मारला जात होता.घरावर पत्रक चिकटवले जात होते.
आरोग्य खात्याचे कर्मचारी दररोज जावून तपासणी करून माहिती घेत होते.पण आता नव्या नियमानुसार हे काहीही करावे लागणार नाही.
ई पास विना कोणत्याही राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील व्यक्ती शिक्षण,नोकरी,उद्योग आणि अन्य कारणासाठी कर्नाटकात प्रवेश करू शकतात.इच्छित स्थळी पोचल्यावर संबंधित व्यक्तीने सर्दी,खोकला,ताप आदी त्रास जाणवल्यास आरोग्य खात्याशी संपर्क साधावा.
हेल्पलाईनवर संपर्क साधावा.कोरोनाची लक्षणे आढळल्यास इतरांपासून अलग राहून उपचार करून घ्यावेत असे नवे नियम आहेत.