Monday, January 20, 2025

/

सर्वधर्मसमभाव!- मुस्लिम युवकांनी केला हिंदू व्यक्तीवर अंतिम संस्कार

 belgaum

मानवतेपेक्षा धर्म आणि जाती मोठ्या नाहीत, याची प्रचिती अनेकदा आली आहे. बेळगावमध्ये एका मुस्लिम युवकानी कोरोनामुळे मृत झालेल्या हिंदू व्यक्तीवर हिंदू धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्कार करून मानवतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही याची प्रचिती बेळगावमध्ये पुन्हा एकदा आली आहे.

काल रात्री बेळगावच्या सराफ गल्लीतील एका ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे यायला कचरत होते. यादरम्यान येथील मुस्लिम युवकाने पुढाकार घेतला. आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. सदाशिवनगर स्मशानभूमीत या मृत व्यक्तीवर स्वतः या मुस्लिम युवकाने हिंदू धर्मानुसार विधी पार पाडून अंत्यसंस्कार केले.

बेळगावच्या अंजुमन संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांनी अशा अंत्यक्रियेसाठी युवकांचा एक समूह तयार केला आहे. कोणत्याही मृत्यूच्या व्यक्तिनंतर मग ती व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो, बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याही गावातील असो, त्या व्यक्तींच्या अंत्यक्रियेसाठी हे तरुण सदैव तत्पर असतात.Muslim youth creamition

आजपर्यंत अशा शेकडो मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी या तरुणांनी पार पडली आहे. तसेच कोरोना रुग्णांवर देखील उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्थाही अंजुमन संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. अंजुमन फ्युनरल टीम या नवे ओळखला जाणारा हा समूह एका फोनकॉलवर घटनास्थळी दाखल होतो हे विशेष.

समाजात नेहमीच जाती, धर्म, भाषा भेद आणि वाद सुरु असतात. परंतु याही पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणाऱ्या या मुस्लिम तरुणांचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घ्यावा आणि तसे अनुसरण करणे हे आजच्या काळात गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.