बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथे काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. मात्र तो अपघात नसून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. महेश महादेव अवनी वय 28 जाणार मुचंडी असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो विद्यार्थी होता. दहा ते बारा दिवसांनंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश येण्याची शक्यता आहे. त्याचा खून कोणत्या कारणासाठी केला याचा लवकरच उलगडा होणार आहे. मारीहाळचे पोलीस निरीक्षक विजय कुमार सिन्नुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यात सुरुवात केली आहे. वाहनाच्या ठोकरीने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलीस दरबारी नोंद करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात हा खून झाल्याचे आता समोर येत आहे.
दिनांक 24 जुलै रोजी मुचंडी-मूतगा रोडवर महादेवचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळेस पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. अनगोळ परिसरात त्याचा खून करून मुचंडी- मुतगा रोडवर तो अपघात भासविण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या महेशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी अपघातात जखमी झाल्याचे सांगून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलिस लवकरच या प्रकरणाचा छडा लावणार आहेत.