मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे गावात उदभवलेला वाद आता मिटला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर, महर्षी वाल्मिकी,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान श्री कृष्णाची अश्या पाच मूर्ती लक्ष्मी मंदिराच्या जागेत बसवल्या जाणार आहेत.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता एका गटाच्या विरोधा नंतर पोलिसांनी ग्रामस्थांना शिवाजी महाराजांचा पुतळा काढायला लावला होता त्या नंतर हे प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले होते.
मनगुत्ती ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते त्या नंतर रविवारी पंच आणि पोलिसांची बैठक आगामी आठ दिवसात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता व पुढील बैठक मंगळवारी घेण्याचे ठरले होते त्यानुसार आज ग्रामस्थ आणि पोलीस पंच मंडळींची बैठक होऊन पाच मूर्ती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी एकाच ठिकाणी पाचही मूर्ती बसवल्या जाणार आहेत त्याचे भूमी पुजनही स्थानिक पंचांनी केलं आहे त्यामुळे आता मनगुत्ती येथील वादाला पूर्ण विराम मिळाला आहे.