मणगुत्ती येथील हटविण्यात आलेल्या शिवपुतळ्याबाबत सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत असून बिदर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनेही आज निषेध नोंदविण्यात आला आहे.
आज रामरावजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत शिवपुतळा हटविल्याने कर्नाटक शासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. आणि असा ठरावही एकमताने संमत करण्यात आला.
यासोबतच कर्नाटक शासन आणि बेळगाव प्रशासनाला निवेदन पोहोचविण्यात आले आहे. हे निवेदन पोहोचण्याच्या आठ दिवसात छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसविण्यात यावा, अन्यथा बिदर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.
याबद्दलची सविस्तर माहिती महाराष्ट्र एकीकरण समिती बिदरचे अध्यक्ष रामरावजी राठोड, उपाध्यक्ष नारायणराव पाटील, भंडारकुंठ, भास्करराव कुलकर्णी, कमालनगर, सचिव पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी कळविली आहे.