देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसा बाबत नोंद मध्ये बेळगावचा आठव क्रमांक आला आहे.
मागील वर्षी ८ आगष्ट रोजी देखील बेळगाव शहरात देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती त्या दिवशी शहरातील जनतेने अभूतपूर्व पूर पहिला होता.
मुंबई नंतर महाराष्ट्रातील माथेरानचा सर्वाधिक पावसाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातील हरणाई गाव हे चौथ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश मधील हुशंगाबाद हे शहर पाचव्या क्रमांक तर सहावा क्रमांक पंचगंगा नदीच्या पुरात अडकलेल शहर कोल्हापूर आहे.पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग हे सातव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक पावसाच्या यादीत बेळगावचा आठवा क्रमांक आहेबेळगाव खालोखाल पश्चिम बंगाल मधील कालीपॉंग हे शहर नवव्या तर महाराष्ट्र मधील डहाणू दहाव्या क्रमांकावर आहे.
news courtasy (https://www.skymetweather.com/content/weather-news-and-analysis/list-of-top-10-rainiest-cities-in-india/):