गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावक्र यांनी शनिवारी इचलकरंजी जवळील वेदगंगा नदीच्या पुलाची पाहणी केली
गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी – नाले तुडुंब भरून वहात आहेत सर्वच जलाशयातील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी सीमाभागातील गावांचा पाहणी दौरा केला. चिकोडी येथील मांजरी नदीची येडूर आदी गावाहून वाहणाऱ्या नाडीची पाणी पाणी पातळी जाणून घेतली.
मागील वर्षी कृष्णा नदीला पूर आल्यामुळे वित्त व मनुष्यहानीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एनडीआरएफ अधिकाऱ्यांसह येडूर तसेच संबंधित अन्य भागाचा पाहणी दौरा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

त्याचप्रमाणे जलाशय आणि नद्यांची कमी-जास्त होणारी पाणीपातळी यासंदर्भात वेळच्यावेळी जिल्हा प्रशासनाला माहिती दिली जावी, अशी सक्त सूचनाही पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
आपल्या पाहणी दौऱ्याच्या कालावधीत जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्जंन्यवृष्टी, जलाशयातील पाण्याची परिस्थिती आणि पाण्याचा होणारा विसर्ग तसेच संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासंदर्भात चर्चा केली.कृष्णा नदी काठावर संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने सुसज्ज झाले आहे.