शहरासोबतच तालुक्यांमधील अनेक रस्त्यांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु या कामाचा श्रीगणेशा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून हे कामकाज रखडले आहे. एपीएमसी ते कंग्राळी खुर्दपर्यंतचा रस्ता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
एपीएमसी ते कंग्राळी खुर्दपर्यंतच्या रस्त्यावरून जवळपास २५ ते ३० गावचे नागरिक ये-जा करतात. तसेच या रस्त्यावर वाहनांची ही मोठी वर्दळ असते.
सध्या यारस्त्याच्या एका बाजूचे कामकाज पूर्ण झाले असून काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. परंतु अलिकडे कांही दिवसांपासून या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे कामकाज अपूर्ण ठेवण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
या अपूर्ण अवस्थेतील रस्त्यावर पावसामुळे पाणी साचले असून हा परिसर खड्डेमय बनला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराला हे काम वेळेत पूर्ण करण्याचा आदेश देऊन वाहनचालक व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.