जल मिशन योजना तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठी आता सरकारतर्फे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील विविध गावात हा सर्वे सुरू करण्यात आला असून लवकरच येत्या वर्षभरात जन्म मिशन योजना पूर्णपणे सक्षम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाकडून प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकाला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात सर्व्हे करण्यात येत असून अगसगेत यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.
अगसगेत येथे जलजीवन मिशन अंतर्गत घरोधरी शुध्द पिण्याच्या पाणी मिळाले यासाठी केंद्र सरकारची जलशक्ती योजना राबवित आहे. त्यासाठीचा सर्व करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हा सर्ल करण्यात आला.
या योजनेतून शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र, आरोग्य केंद्र, पशु प्राथमिक केंद्रांना पाणी देण्याची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक घराला एक नळ देवून ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायात येणार आहेत.
बहूग्रामीण पाणी योजना राबवून नागरिकाने जीवनमान उंचाविण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. अगसगेत लवकरच आता योजना कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत.