पिरनवाडी येथे सुरु असलेला वाद इतक्या लवकर मिटेल, याचा अंदाज नव्हता, हा वाद इतक्या लवकर मिटला याचे आश्चर्य वाटते, असे वक्तव्य मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे.
चार दिवसांपूर्वी मी बेळगावला भेट देण्याचा विचार केला होता असे त्यांनी सांगितले. आज सकाळी सांबरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा या दोन वीरपुरुषांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि केलेला संघर्ष अविस्मरणीय आहे.
परंतु दोन समाजामध्ये पुतळ्यांवरून सुरु झालेल्या वादामुळे वेगळंच वातावरण जाणवत होतं. काळ सायंकाळी झालेल्या शांतता सभेनंतर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वानाच आनंद झाला असून बेळगावमध्ये दोन समाजामध्ये झालेला वाद मिटण्यासाठी घेतलेला हा निर्णय मॉडेल म्हणून आदर्शवत ठरेल.
शुक्रवारच्या वादामुळे विविध तीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती. गृहमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली. तसेच याप्रकरणी यश मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. दोन्ही समाजातील नेत्यांशी चर्चा करून समन्वयाने हा वाद मिटविण्यात आला असून तणावाचे वातावरण निवळले आहे. हा समन्व्य साधण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी अभिनंद करतो, असे मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.