शहरातील आयसीएमआर – एनआयटीएम कॅम्पसमधील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तीन महिला कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोरोना चांचणी करणारी आयसीएमआर प्रयोगशाळा आज रविवारी बंद करण्यात आली.
येथील आयसीएमआर – एनआयटीएम कॅम्पसमधील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या तीन महिला कामगार आज रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे या कॅम्पसच्या आवारात असणाऱ्या कोरोनाची चांचणी करणाऱ्या आयसीएमआर प्रयोगशाळा आज रविवारी टाळे ठोकण्यात आले.
तसेच संबंधित तीन कोरोनाग्रस्त महिला कामगारांना कोविड उपचार केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत आयसीएमआर कॅम्पस मधील 13 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.
सदर आयसीएमआर प्रयोगशाळेत दिवसाला जवळपास 800 ते 900 स्वॅबच्या नमुन्यांची चांचणी केली जात होती. यापद्धतीने या प्रयोगशाळेवर सध्या मोठी जबाबदारी असल्यामुळे निर्जंतुकीकरणानंतर उद्या सोमवारपासून या ठिकाणचे काम पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.
कोरोना बाधित तीन महिला ज्या कॅन्टीनमध्ये काम करत होत्या त्या ठिकाणी दररोज सुमारे 180 जण सकाळचा नाश्ता करत होते. त्यामुळे त्यांनाही संबंधित महिलांनामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कॅन्टीनमध्ये नाश्ता करण्यास येणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.