हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही उघडण्याची शक्यता आहे.त्यामुळे हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीच्या काठावरील गावात रहाणाऱ्या जनतेने सावधगिरी बाळगावी असे कर्नाटक जल निगमच्या अधीक्षक अभियंत्यांनी कळवले आहे

हिडकल जलाशय घटप्रभा नदीवर आहे आणि घटप्रभा बेळगावं आणि चंदगड तालुक्यातील पावसाचे जमा होते. मार्कंडेय नदी आणि बळळारी उतून वाहत आहे हेच पाणी पुढे घटप्रभा नदीला जाऊन मिळालं आहे त्यातच
महाराष्ट्र राज्यातून कोल्हापुर जिल्ह्यातुन बेळगाव जिल्ह्यात कृष्णा नदीत सव्वा लाखाहून अधिक क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे परिणामी बेळगाव जिल्ह्यातील सगळी धरण तलाव भरले आहेत.
घटप्रभा नदीवरील हिडकल जलाशयाच्या काठावर असणाऱ्या या गावांना अधिकाऱ्यानी हाय अलर्ट दिला आहे.गेल्या वर्षी सारखी परिस्थिती यावर्षी निर्माण होऊ म्हणून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे.