कोरोना विषाणू संसर्गाचा सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सुळगा (हिंडलगा) येथील हळदी युवक मंडळाने घेतला आहे.
अश्या आरोग्य व आर्थिक आणीबाणीच्या काळात इतर अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा निर्णयया मंडळाने घेतला आहे. नुकताच या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षानी हा निर्णय जाहीर केला आहे.
अध्यक्ष मारुती अशोक पाटीलयांनी सांगितले कि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळासमोर आदर्श निर्माण केला आहे याचबरोबर गणेश मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेमध्ये करण्यात येणार आहे अतिरिक्त खर्चाला फाटा देण्यात येणार आहे.
सुळगा येथील या मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील इतर मंडळानी देखील या मंडळाचा आदर्श घायाळ हरकत नाही.