विजेच्या खांबाला अचानक आग लागल्यामुळे जनतेत काही काळ घबराट पसरली होती.
अशोक नगर येथे सकाळी विजेच्या खांबाला अचानक आग लागली.खांबावरील वायरनी पेट घेतल्याने आग आणि धूर येत होता.विजेच्या खांबाने पेट घेतल्याने काय करायचे हे काही काळ कोणालाच समजले नाही.
काही वेळाने विद्युत पुरवठा विभागाच्या कार्यालयात फोन करून विजेच्या खांबाने पेट घेतल्याची माहिती देण्यात आली.विद्युत पुरवठा खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून त्या खांबाचा विजेचा पुरवठा बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
विजेच्या खांबाने पेट घेतल्याने घाबरून घराबाहेर काही काळ कोणीच बाहेर पडले नाही.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा विद्युत पुरवठा खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला.