रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, नागेनहट्टी, बडाल अंकलगी या गावातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीत मोजमाप करून पोळ रोवण्यात आले. आहेत. या प्रस्तावित रेल्वे मार्गाला येथील शेतकऱ्यांचा विरोध असून याच्या निषेधार्थ आज शेतकऱ्यांची बैठक पार पडली.
नंदिहळ्ळी येथील लक्ष्मी मंदिरात नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, नागेनहट्टी, बडाल अंकलगी येथील शेतकऱ्यांनी बैठक बोलावून चर्चा केली आणि या प्रस्तावित रेल्वे मार्गाला विरोध दर्शविण्याचा ठराव पास केला.
शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून नवीन रेल्वेमार्ग करू नये यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीला परशराम कोलकार, चेतन पाटील, सुरेश जाधव, यल्लाप्पा पाटील, डॉ. किरण लोंढे, सुधाकर पाटील, मारुती जाधव, यशवंत कामान्नाचे, मारुती राऊत, प्रकाश कामान्नाचे, राजू पाटील, लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.