शुक्रवारी पिरनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होऊन तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शांतता बैठक घेऊन हा वाद मिटवण्यात आला होता. परंतु त्यानंतर काही कन्नड संघटनांनी उहापोह माजविला असून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान एका कन्नड संघटनेच्या फेसबुकपेजवर छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे. यामुळे तमाम शिव भक्तामध्ये संतापाची लाट उसळली असून सीमाभागातील शिवप्रेमी संघटनांच्यावतीने आज मार्केट पोलीस स्थानकापासून पोलीस आयुक्तालयांपर्यंत निषेध मोर्चा काढला. पोलीस आयुक्तां समोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर तसेच फेबूक पेजच्या अँडमिनवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फेसबुक पेजवर शिवरायांविरोधात आक्षेपार्ह मजकूर तसेच फोटोज अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे तमाम शिवभक्तांनी आज निषेध करत पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला. यादरम्यान पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात आली. तसेच सायबर क्राईमच्या अंतर्गत संबंधित पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चात एक मराठा लाख मराठा चे प्रकाश मरगाळे, रमेश गोरल, मदन बामणे, किरण गावडे, बंडू केरवाडकर ,जयराज हलगेकर अरविंद नागनुरी, प्रकाश शिरोळकर,सुनील जाधव ,शिवप्रतिष्ठान,शिवसेना युवा समिती सह शिव भक्त कार्यकर्ते आणि शेकडो शिवसैनिक सामील झाले होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2649322365330329&id=375504746140458