बेळगावात अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शहर तसेच तालुक्यातील एकही भागात कोरोना रुग्ण आढळला नाही असे अपवादात्मक झाले आहे. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असून हि सर्व परिस्थिती चिंताजनक वाटत आहे.
बेळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा शिरकाव झाला. दरम्यान काही दिवसांसाठी येथील व्यवहारही बंद ठेवण्यात आले. त्यानंतर दोघां व्यापाऱ्यांची निधन झाले. यामुळे याची धास्ती येथील व्यापाऱ्यांसहित, कर्मचारी आणि ग्राहकांनीही घेतली आहे. यासाठी खबरदारी म्हणून काही दिवसांकरिता एपीएमसी बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोरोनाची बाधा सुरु झाल्यापासून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे प्रकार अनेकवेळा उघडकीस आले आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी एपीएमसीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सध्या मार्केट यार्डातील १२ व्यापारी अत्यवस्थ आहेत त्यामुळे विविध रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद करून घरी रहाणे पसंद केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी एपीएमसी प्रशासनाने विचारविनिमय करून व्यापारी, ग्राहक, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी येथील व्यवहार काही दिवसांकरिता बंद ठेवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.