Tuesday, January 21, 2025

/

बळ्ळारी नाल्याचा पूर बायपास रस्ता शेतकऱ्यांना ठरतोय गळफास

 belgaum

गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा विरोध,आंदोलन डावलून तिबारपीकी सुपीक जमीनीतून महामार्ग प्राधीकरणाने पोलिसी दडपशाही करत हालगा-मच्छे बायपासचे काम सुरु केले.त्यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून अटकही झाली आणी लगेच जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाड्यासह मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

शासनावर दबाव वाढवला होता तात्कालीन काँग्रेस कर्नाटक शासनाचे मंत्री आले होते त्यांचा रस्ता अडवून बेकायदेशीर बायपास रद्द करा म्हणून त्यांच्यासमोर धरणे धरले.आश्वासन दिल्याने काम थांबले होते.पण पुन्हा मच्छे पासून कामाला सुरुवातझाली होती मात्र शेतकऱ्यांनी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करत काम बंद पाडवले त्याच काळात पन्नास शेतकऱ्यांनी न्यायमागणीसाठी मा.उच्च न्यायालयात धाव घेतली.

या पट्ट्यातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट असतानांही बँकेत कर्ज काढून जून 2019 ला दावा दाखल केला आणि डिसेंबर 2019 ला या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळवली ती आजतागायत आहे.
गेल्या आणी यावर्षी बायपासचे काम केलेल्या ठिकाणी पूराचे पाणी आडून पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते सर्व पाणी आधी बळ्ळारी नाल्याला जात होते ते आडून आजूबाजूचे शेतकरीही पुन्हा मोठ्या चिंतेत.जर बायपास झाला नसता तर त्या पट्ट्यातील शेतकरी तरी तरले असते.

पण येथील शेतकऱ्यांप्रती आत्मियता दाखवणारे लोकप्रतिनिधी आणी प्रशासनास काकुळती आली नाही.पण शेतकऱ्यांनी आपला लढा सातत्याने सुरुच ठेवला आहे.पण आधी पावसाच्या पुरात सुध्दा तरत धिरोदात्तपणे जगणाऱ्या शेतकऱ्यांना बळ्ळारी नाला आणी बायपासमूळे गळफास ठरतोय त्यावर कायमचा पडदा पाडत येथील शेतकऱ्यांना न्याय मीळवून देण्यासाठी कुनां ला सद्बुद्धी सुचेल का ?

flood bellari nala
flood bellari nala

दरवर्षीच्या बळ्ळारी नाल्याचा पूराने शेतकरी चिंतीत

एकेकाळी वरदान ठरलेला बळ्ळारी नाला अलिकडे दहा वर्षापासून डोकेदुखी ठरत आहे.येथील लोकप्रतिनिधी तसेच शासन दरबारी सतत पाठपुरावा करुनही अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलेजाते त्यामूळे अनगोळ, शहापूर,वडगाव,जुनेबेळगाव,हालगा,बेळगावसह जिथपर्यंत बळ्ळारी नाला आहे त्याच्या आजूबाजूच्या शेतीला पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिंतेतच ढकलून देतो.पण प्रामाणीकपणे कुणी नेत्याने बळ्ळारी नाला स्वच्छ करुन शेतकऱ्यांना समाधान देन अजूनपर्यंत कुणालाही जमल नाही.

2013 पासून बळ्ळारी नाल्याला 80 कोटीचा निधी झालाय म्हणून सांगितले गेले पण अजूनही त्याचा पत्ताच नसल्याने आता कुणाकडे पाठपुरावा करावा म्हणजे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न धसास लागेल हेच कळन मुश्किल झालेले आहे.
बळ्ळारी नाल्यात जूना पूणा-बेंगलोर रोडवरील बळ्ळारी नाला पुलाजवळील माधवपूर शिवारात एका व्यवसाईकांने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यानां निवेदन दिले पुलावर रास्तारोको करुन आंदोलन केले तरीही कोना नेत्याला किंवा संबधीत अधिकाऱ्यानां शेतकऱ्यांची ती जटिल समस्या सोडवण्याचे धाडस झालेनाही.

शेतकऱ्यांनी मा.लोकायुक्त न्यायालयात धाव घेतली. त्याचा निर्णयही झाला पण अजूनतरी कारवाई झाली नाही. आमदारांनी येऊन नाल्याच्या बाजूला नियमाप्रमाणे बफरझोन जागा न सोडता चक्क बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण करुन त्यानंतर बेकायदेशीर दोनमजली इमारत बांधली याचीही पहाणी करत असतानां शेतकऱ्यांनी ते अतिक्रमण व भराव टाकून भिंत बांधल्याने जुनेबेळगाव,वडगावचे पावसाचे पाणी आडून येडियुराप्पा मार्गात पाणी येऊन वहानांना जाण्या येण्यास अडचण होते हे अनेकदा मीडिया तुन बातम्या प्रसिद्ध झाल्या परत जुनेबेळगाव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वेगळे.
असे दरवर्षी पूराने शेतकऱ्यांचे नुकसान झाले कि येथील शेतकरी टिकणार कसा ? या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या अडचणी न सोडवता त्यांना नुकसानीच्या खाईत न लोटता लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रामाणीक प्रयत्न करुन कायमचा बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडवून परिसरातील शेतकऱ्यांत समाधान ज्या दिवशी पसरेल तो दिवस सुदिन असेल.पण त्यासाठी शेतकऱ्यांप्रती आत्मियता हवी.

– राजू मरवे. शेतकरी वडगाव बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.