बंधाऱ्यातील पाणी शिवारात जाऊन नुकसान होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका वारंवार शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील विविध ठिवत्रणी सार्वजनिक बांधकाम स्वात्याच्या अखत्यारित येणाऱ्या नाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अयोग्यरित्या नाले बांधकाम झाल्याने पावसाळ्यात त्याचे पाणी शेतीमध्ये जावून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकरी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
ग्रामीण भागत नदी , नाल्यावर लहान पूल बंधारे, ओढे बांधण्यात आले आहेत. मात्र कंत्राटदारांच्या हेळसांड कामामुळे आता हेच बंधारे आणि ओढे शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढविणारे ठरत आहेत, त्या अनुषंगाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे . सार्वजनिक बांधकाम खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी मिळाली आणि कंत्राटदाराकडून मिशन मिळाले तर मनमानी कारभार करुन बांधकाम करण्यात येते.
त्याचा फटका इतराना असू नये याची दखल घेण्यात येत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
दरम्यान अधिक तर शेतामध्ये असाागा बाध सुव्यवस्थीत नसल्यामुळे त्याच्यावरुन येणारे पाणी थेट शिवारात शिरते आणि शेतीचे नुकसान होत आहे. तालुक्यातील विविध भागात याचा फटका बसला आहे. कत्राटदाराच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभामुळे हा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत आहे.