एकविसाव्या शतकात जगत असताना अजूनही अनेक नागरिक करणीबाधाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. ही मानसिकता सध्या बदलण्याची गरज निर्माण झाली असून याबाबत आता पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
हिंडलगा येथील एका शिवारात करणीबाधा हा प्रकार निदर्शनास आला आहे. नेमके कोणते समाधान मिळते हाच प्रश्न अंतर्मुख करणारा ठरत आहे. काहींच्या हीर्से पोटी असे प्रकार सर्रास पहावयास मिळत आहेत. बेळगाव शहर आणि परिसरातील चौका-चौकात लिंबू भोपळा व इतर साहित्य टाकून करणीबाधा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
विशेष करून ग्रामीण भागात असे प्रकार पहावयास मिळत आहेत. हा सारा प्रकार खोडून काढण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत असताना अजून भोंदू बाबा व अंधश्रद्धा संपुष्टात आलेली नसल्याचे अशा प्रकारावरून निदर्शनास येत आहे.
बेळगाव शहर आणि तालुक्यात सर्रास असे प्रकार निदर्शनास येत आहे. एकविसाव्या शतकात अजूनही नागरिकांची मानसिकता अंधश्रद्धेकडे असल्याने संताप व्यक्त होत आहे.