अलतगा ते कडोली रस्त्याची दुरावस्था अलतगा ते कडोली रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मागील दोन-तीन वर्षापूर्वी हा रस्ता करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्याने हा रस्ता पुन्हा खचला आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता केला होता. मात्र याठिकाणी खडीमशीन असल्याने अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हा रस्ता पुरता खराब झाला आहे. हा रस्ता कडोली आंबेवाडी मनुर गोजगा याठिकाणी जोडला गेल्याने येथून प्रवाशांची मोठी वर्दळ असते.
मात्र रस्ता खराब झालेले मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांतून संताप व्यक्त होत असला तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणेही गरजेचे आहे.
अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.