बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरोनामुळे या स्पर्धा ऑनलाइन घेतल्या जातील असे कळवण्यात आले आहे.
श्लोक पाठांतर ,कथाकथन ,गायन चित्रकला आणि रांगोळी अशा चार प्रकारच्या स्पर्धा तीन गटात घेतल्या जाणार आहेत. पहिला गट : दुसरी ते चौथी, दुसरा गट : पाचवी ते सातवी आणि तिसरा गट :आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांच्यासाठी असेल .सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहे.
1) श्लोक पाठांतर: भगवद् गीतेच्या अकराव्या अध्यायातील असेल पहिल्या गटासाठी श्लोक 1 ते 10, दुसऱ्या गटासाठी 1 ते 15 व तिसऱ्या गटासाठी श्लोक 1 ते 20 ,पाठांतर केलेले श्लोक असलेला व्हिडिओ मोबाईल क्रमांक 7846058520 या क्रमांकावर पाठवावा
कथाकथन स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी रामायण, महाभारत ,भगवद्गीता किंवा श्रीमद्भागवत यावर तीन मिनिटाची कथा रेकॉर्डिंग करून ती 9343476651 या मोबाईलवर पाठवून द्यावी
गायन स्पर्धेत भाग घेणाऱ्यनी प्रभुराम , कृष्ण किंवा विष्णू यांच्या वर आधारित जास्तीत जास्त तीन मिनिटाचे वैष्णव गीत सादर करून ते 9242114106या क्रमांकावर पाठवावे चित्रकला रंगोली मध्ये भाग घेणाऱ्यानी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील विविध चित्र अथवा रंगोली काढून त्याचे फोटो 9844142263 या क्रमांकावर पाठवावेत
स्पर्धकाने आपले नाव ,शाळेचे नाव आणि फोन नंबरही पाठवा हे सर्व पाठवण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट असून या स्पर्धांचे निकाल श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी 12 ऑगस्ट रोजी जाहीर केले जातील अधिक माहितीसाठी 9448758650 किंवा 9448034981 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे