Saturday, January 18, 2025

/

असा आहे बेळगावातील हेस्कॉम आणि पोलिसांचा हलगर्जीपणा

 belgaum

रस्त्यावर झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळू लागल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे कोणताही धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेऊन हेस्कॉम आणि पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने एका महिलेने बेळगावच्या या दोन्ही खात्यांवर ताशेरे ओढले आहेत.

सदर महिला हैदराबाद येथे असते कांही कारणास्तव ती सध्या बेळगावला आली असून हैदराबाद आणि अन्य राज्यांमध्ये 100 नंबरला किंवा अन्य आपत्कालीन सेवेला फोन केल्यानंतर पोलीस किंवा संबंधित खात्याचे अधिकारी ताबडतोब धावून येतात. त्यांचा फोन बिझी असेल तर परत पाच मिनिटांनी पुन्हा स्वतः फोन करतात. पण बेळगांव मात्र याबाबतीत अत्यंत दुर्दैवी आहे, आणि येथील सर्वसामान्य लोक कसे राहात असतील याची मला कल्पना करवत नाही असे त्या महिलेने म्हंटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुसळधार पावसामुळे हेरवाडकर शाळेसमोर एक मोठे झाड उन्मळून पडले. त्याबरोबर विद्युत तारा ही रस्त्यावर कोसळल्या. ट्रांसफार्मर बंद पडला. परिणामी समोरच्या मंगलदीप अपार्टमेंटसह परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.

काल बुधवारी रात्री 1 वाजता ही घटना घडली. मात्र पाऊस, उखडलेले रस्ते, मधेच पडलेल्या विद्युत तारा आणि झाड यामुळे चुकून एखादा दुसरा कोणी या मार्गाने जात असेल तर अपघात होण्याची किंवा त्याचा कपाळमोक्ष होण्याची शक्यता लक्षात घेऊन रश्मी नामक महिलेने हेस्काॅमला सातत्याने संपर्क साधला. त्याचप्रमाणे पोलिसांनाही संपर्क साधला. त्यांनी सातत्याने 100 नंबरला देखील फोन केला परंतु या नंबर वरून सुद्धा कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. आपण हैदराबादमध्ये राहत असून तेथे पोलीस, विद्युत खाते किंवा अन्य कोणत्याही खात्यात आपल्याला असा अनुभव कधीच आला नाही. नागरिकांच्या समस्येला किंवा फोनला तेथील अधिकारी त्वरित प्रतिसाद देतात आणि समस्यांचे निवारण करतात.

मात्र बेळगावमध्ये ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आपण अनुभवली. त्यावरून येथील सर्वसामान्य नागरीक येथे कसे राहात असतील याची मला कल्पना आलेली आहे असे या महिलेने म्हंटले आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणीसाठी त्यांनी त्वरित कोठे संपर्क साधावा यासाठीचे फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणीही या महिलेने केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.