जवळपास मंदिर नसलेल्या गणेश मंडळांना लहान मंडप घालण्यास परवानगी द्या अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे.
कोरोना काळात शासनाने नियमावलीनुसार सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे ज्या गणेश मंडळांच्या परिसरात जवळपास कोणतेच मंदिर नाही किंवा सभागृह नाही जागा अपुरी आहे अश्या गणेश मंडळांना लहान मंडप घालायला परवानगी द्यावीअशी मागणी त्यांनी केली आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यातील अनेक गणेश मंडळ आपल्याकडे समस्या मांडत आहेत आपण शासनाचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा करू असे त्यांचे म्हणणे आहे .
कोविड काळात शासनाची नियमावली अनुसार गणेश उत्सव पाळणे गरजेचे देखील आहे मात्र नियमावलीतील काही जाचक अटी शिथिल कराव्यात .कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनचे कार्य सुरु आहे ते सराहणीय आहे असेही गोरल यांनी जिल्हाधिकारी याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.