गोवा येथून गुजराथला नेण्यात येणारा सुमारे ३० लाख रुपयांचा दारूसाठा अबकारी खात्याने जप्त केला आहे. अबकारी खात्याच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.
यामध्ये धनपाल सिंग तोमर, राजू लगमव्वा
कंडी या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. विजयकुमार हिरेमठ यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेसंदर्भात खात्याचे संयुक्त आयुक्त मंजुनाथ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.