शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेला तडा देऊ पाहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सायबर क्राईम विभागाने केली आहे. शिवाय सोशल साईटवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
शुक्रवारपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्यावरून सुरु झालेल्या वादावर पोलिसांनी हस्तक्षेप करून पडदा पाडला होता. त्यानंतर फेसबुक पेजवर शिवरायांविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यानंतर शहरात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था तसेच शांततेला धोका पोहोचवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी सायबर विभागाने सुरु केली आहे.
पिरनवाडीतील प्रकरणानंतर बेळगाव शहर पोलिस, खडे बाजार पोलीस स्टेशन आणि बेळगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
त्यानंतर सोशल साईटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला. त्यानंतर तमाम शिवसैनिकांनी कारवाईची मागणी केली असून याबाबत आता सायबर क्राईम अधिकारी चौकशी करत आहेत. हि पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर क्राइम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर सायंकाळी पर्यंत कारवाई करू-पोलिसा आयुक्तांचे आश्वासन
#shivajimaharaj
#belgaumsocialmedia
#belgaumpolice
#livebelgaum