चिकन, दारू दुकानचा कचरा ग्रामपंचायत हद्दीत टाकून वारंवार त्रास देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायत हद्दीत हा प्रकार घडत आहे. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या वतीने हा कचरा काढण्यात येत असला तरी या चिकन दारू दुकानात मालकावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
बेळगाव वेंगुर्ले मार्गावर असलेल्या हिंडलागा गावा जवळ मुख्य रस्त्यावर कचरा वांरवार दिसतो. दारू दुकाने असो कींवा मटण चिकन दुकान सर्व कचरा रस्त्यांवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात एकच दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे संबंधितांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतीने संबंधितांना वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र त्यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा कचरा मुख्य रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने इतरत्र पसरत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे.
हिंडलगा ग्रामपंचायतीने या रस्त्यावरील कचरा वारंवार काढण्यात आला असून तेथे पुन्हा कचरा फेकून देण्यात येत आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून कचरा काढण्यात आला. मात्र पुन्हा फेकण्यात येत असल्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आता कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर चिकन दुकाने दारू दुकाने व इतर दुकाने आहेत.
त्यांचा कचरा याठिकाणी फेकण्यात येत आहे. त्यामुळे कचरा काढून देखील पुन्हा फेकण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे फेकणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करू लागले आहेत.